शिवसेनाप्रणित युवतीसेनेची वणीत स्थापना

स्नेहा ताजने यांची वणी शहर युवती अधिकारी तर साक्षी मेश्राम उपशहर युवती अधिकारी

0 12

विवेक तोटेवार, वणी: शिवसेनाप्रणित युवतीसेनेची मंगळवारी वणीत स्थापना झाली. स्नेहा ताजने यांची वणी शहर युवती अधिकारी तर साक्षी मेश्राम यांची उपशहर युवती अधिकारी पदी निवड करण्यात आली . शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर आणि युवासेना विस्तारक दिलीपदादा घुगे यांच्या मार्गदर्शनात हे कार्य सुरू झाले.

युवासेना यवतमाळ जिल्हाप्रमुख विक्रांतजी चचडा यांचा कार्याने प्रेरीत होऊन अनेक युवतींनी युवासेनेत प्रवेश घेतला. यावेळी युवतींनी शिवबंधन बांधले. यावेळी उपतालुका प्रमुख अनुप चटप,  उपशहर प्रमुख अमित लिचोडे उपस्थित होते. सर्व नवयुक्त पदाधिकाऱ्यांचे युवतीसेनेने अभिनंदन आणि स्वागत केले.

युवतींच्या कर्तृत्वाला चालना – विक्रांत चचडा
वणीत युवतीसेनेची स्थापना झाली.  आता युवतींच्या आणि स्त्रियांच्याही कतृत्वांना यातून चालना मिळेल. युवतींनी आणि महिलांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्या प्रश्न आणि समस्यांना वाचा फोडावी. प्रज्ञावंत आणि कुशल युवतींना त्यांच्या कतृत्वाची चुणूक दाखवण्याची यातून संधी मिळणार आहे. वरिष्ठांचे त्यादिशेने नियमित मार्गदर्शन आहेच. परिसरातील सर्व युवती आणि स्त्रियांनी युवतीसेनेत यावे, अशी मी नम्र विनंती करतो.
-विक्रांत चचडा, जिल्हाप्रमुख, युवासेना

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.