दुचाकी व मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात 

दोन दुचाकी आणि पाच मोबाईल जप्त

0 394
वणी: अलिकडेच शहरात दुचाकी आणि मोबाईलचोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मोबाईलचोरीनं आणि दुचाकी चोरीनं सर्वसामान्य त्रस्त झाले होते. वणीत अशाच एका दुचाकी आणि मोबाईल चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे.
शहरातील रामपुरा भागात एक तरुण दुचाकीनं संशयितरित्या फिरत होता. त्यावळे गस्तीवर असलेले ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, शेख नफिस, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे,सुधीर पांडे यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव आकाश सुरेश मेश्राम (२६) रा. रामपुरा वार्ड अशी माहिती दिली. त्याच्या जवळून दोन यामाहा कंपनीच्या दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या एका दुचाकीवर नंबर नाही, तर दुस-या दुचाकीचा एम एच 31 इ ६८४६ असा नंबर आहे. ५५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी व  १८ हजाराचे ५ मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिसांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.