वीज कोसळून दोन बैलाचा मृत्यू, तर दोन महिला जखमी

सालई पोड येथील घटना, शेतक-याचे सव्वा लाखांचे नुकसान

14

भास्कर राऊत, मारेगाव: खंडणी जवळील सालई पोड येथे गोठ्यावर वीज पडून दोन बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. सदर बैल लक्ष्मण चेंडकू टेकाम (55) असे असून ऐन शेतीच्या हंगामात होतेनव्हते दोन्ही बैल दगावल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. ही घटना दिनांक 15 जुन 2022 रोज बुधवारला दुपारी 3 च्या सुमारास घडली.

तालुक्यातील खंडणी जवळील सालई पोड येथील शेतकरी लक्ष्मण चेंडकू टेकाम यांच्या शेतामध्ये टोबनीचे काम सुरु होते. सकाळी सारे फाडून बैल शेतामध्ये असलेल्या गोठ्यामध्येच बांधलेले होते. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आकाशामध्ये ढग दाटून आले. काही वेळातच विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. मजूर शेतामध्ये असलेल्या गोठ्यामध्ये आसऱ्यासाठी गेले. मात्र त्याचवेळी गोठ्यावर वीज कोसळली.

यात गोठ्यामध्ये बांधलेल्या दोन बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर 2 महिला मजुरांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच खंडणी येथील तलाठी काही वेळातच घटना स्थळी दाखल झाले. आणि घटनेचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

सूट मॅकरून स्टुडंट अकॅडमीमध्ये पालकांकरिता विशेष सूट

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.