मारेगावजवळ पहाटे ट्रकचा अपघात

आंबे नेणारा ट्रक पलटी, चालक गंभीर जखमी

0 994

ज्योतिबा पोटे, मारेगाव: आज पहाटे मारेगाव शहराजवळ सूर्यपेठ (आंध्र प्रदेश) येथून अमरावतीकडे जाणारा आंबे भरलेला ट्रक पलटी झाला. यात ट्रकचालक जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

प्राप्त माहिती नुसार ट्रक चालक समीर शहा (19) हा सूर्यपेठ, आंध्रप्रदेश येथून कोरपना मार्गे अमरावतीला आंब्याने भरलेला ट्रक (एमएच ४०, बी एल ४९९८) घेऊन जात होता. शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या अहेफाज जिनींग जवळ पहाटे साडे चार वाजताच्या दरम्यान ट्रकचालकाला डुलकी आली. त्यामुळे ट्रकवरचा चालकाचा ताबा सुटला व ट्रकने खाली जाऊन पलटी झाला.

या अपघातात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला प्राथमिक उपचारा साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत जास्त गंभीर दुखापत असल्याने त्याला तातडीने यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.