प्रचारासाठी विजय चोरडिया यांचा विविध गावात दौरा

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रोज 4-5 गावांना भेटी

9

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील विविध गावात विजय चोरडिया यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दौरा सुरु आहे. त्यांची गावखेड्यात सुरु असलेल्या कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसात जवळपास 30 ते 40 गावांचा दौरा त्यांनी केला आहे.

विजय चोरडिया हे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ गावखेडे पिंजून काढीत आहे. सकाळी 8 वाजता सहका-यांसह सुरु झालेला यांचा दौरा रात्री उशिरापर्यंत सुरु असतो. रात्री उशिर झाला तरी सकाळी पुन्हा त्याच जोमाने व उत्साहाने त्यांचा प्रचार सुरु होतो. रोज एक भाग निवडून त्या भागात त्यांचा प्रचार सुरु असतो.

मतदारांना विकास हवा – विजय चोरडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे राजकारण मतदारांना आकर्षीत करीत आहे. ग्राम सडक योजने अंतर्गत ग्रामीण भागात पहिल्यांदाच पक्के रस्ते झाले आहेत. शेतक-यांना किसान सन्मान निधी द्वारा मदत होत आहे. तसेच विविध योजनांमुळे ग्रामीण भागात भाजपची लोकप्रियता वाढलेली आहे. त्यातच सुधीर भाऊंसारखा ज्येष्ठ आणि विकासाचे राजकारण करणारा उमेदवार असल्याने यावेळी विजय निश्चित आहे.

विजय चोरडिया हे गावात पोहोचल्यावर आधी ओळखीच्या व्यक्तींची भेट घेतात. गावात तातडीने कॉर्नर सभेची तयारी केली जाते. रोज चार ते पाच कॉर्नर सभा त्यांचा होतात. याशिवाय गृहभेटीद्वारे ते मतदारांशी संवाद साधत आहे. विजय चोरडिया यांच्यासह त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.