चिमुकल्या मो. अलीने ठेवला एक आदर्श

या रमजान महिन्यात केला पहिला रोजा

12

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पवित्र रमजान महिना लागला आहे. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास करतात. आबालवृद्ध हे तत्त्व पाळतात. केवळ 9 वर्षे वयाच्या मो. अली मोहम्मद इकबाल शेखने आपल्या पालकांकडे रोजा ठेवण्याचा आग्रह धरला. या चिमुकल्यानेदेखील आपला पहिला रोजा पूर्ण केला. स्थानिक काळे ले-आऊटमधील पत्रकार इकबाल शेख यांचा तो मुलगा आहे. पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल अलीचे मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले.

त्याने पहाटे 5 वाजल्यापासून सायंकाळी 6.30 वाजता रोजा पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अलीला नवीन कपडे देण्यात आलेत. त्याच्या गळ्यात हार घालण्यात आला. सायंकाळी फलाहार करून त्याने रोजा सोडला. त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.