चंद्रपूर जाणारी अवैद्य दारू पोलिसांनी पकडली

0 720

वणी/विवेक तोटेवार: बुधवारी दुपारी वणी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू भालर रोडवरील आयटीआय समोर पकडली. या कार्यवाहीत चंद्रपूर येथील दोन आरोपीने पकडण्यात आले आहे.

बुधवारी दुपारी पोलीस सहायक निरीक्षक महादेव पडघन हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोन इसम दुचाकी वाहनाने संशयस्पद जाताना दिसले. त्यांनी त्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 5560 रुपयाची विदेशी दारू आढळून आली. याबाबत आरोपी सागर रामजीवन चौधरी (26) राहणार बापटनगर चंद्रपूर व दिलीप नागेश कुनवरे (27) राहणार चांदा पब्लिक स्कूल जवळ चंद्रपूर यांना अटक केली आहे.

त्यांच्याजवळून दुचाकी वाहन क्रमांक एम एच 34 ए एस 3766 व दारू असा एकूण 35560 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ)नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक महादेव पडघन करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.