निर्गुडा नदीत सापडला इसमाचा मृतदेह

रविवारी संध्याकाळची घटना

0 2,072

विवेक तोटेवार,वणी: रविवारी संध्याकाळच्या सुमारास वणीतील मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पात्रात पुलाखाली एका इसमाचा मृतदेह सापडला. मृतकाची ओळख पटली असून तो रंगनाथ नगर वणी येथे राहत असून मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे.

रविवारी 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मुकुडबन रोडवरील पुलाखाली एक इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन इसमास नदीतून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले. 9 वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली.

सदर इसमाचे नाव अरुण पुंडलिक गेडाम (40) असून तो रा. रंगनाथ नगर येथील रहिवासी होता. तो वेडसर असून फक्त जेवण करण्याकरिता घरी येत असे व दिवसभर इतरत्र फिरत असायचा अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. शनिवारी तो घरी आला नाही. त्याचे लहान बंधू यांनी शुक्रवारी सकाळी अरुण यास घरी बघितले होते.
कदाचित नदीच्या पात्रात शौचास गेल्यानंतर पाय घसरून नदीत पडला असावा अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर घटनेचा तपास हा पोहेकॉ गोपाळ उताणे करीत आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून वणी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.