उद्या वणीत शहीद जवानांना आदरांजली

शिवतीर्थ येथे सकाळी 10 वा. श्रद्धांजली कार्यक्रम

0 798

वणी: पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता श्रद्धांंजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मेनबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली व्यक्त करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनेसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

काल 14 फेब्रुवारीला काश्मिर येथील पुलवामा इथे दहशतवाद्यांनी सैनिकाच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्यात 42 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्र आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी व शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी वणीत आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.