अविनाश लघुपटातील संपूर्ण टीमचा वणीत सत्कार

लयतरंग संगीत विद्यालय व बहुजन स्टुडन्ट्सतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

14

विवेक तोटेवार, वणी: रविवार 13 फेब्रुवारी रोजी वणीतील लयतरंग संगीत विद्यालयात अविनाश या लघुपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. बहुजन स्टुडंट्स फेडरेशन आणि युवा समरागंण बहुद्देशिय संस्था, वणी द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अविनाश या लघुपटातील दिग्दर्शक अक्षय रामटेके, या लघुपटाचे कथा गणेश मत्ते यांची आहे.

‘अविनाश’ यांची मुख्य भूमिका अविनाश शिवनीतवार यांनी केली. सोबतच या चित्रपटात आस्था दहेकर, मंगेश गोहोकार, चेतन वांढरे, अतुल खोब्रागडे, हर्षद गहूरकर, निखिल उरकुडे, प्रिया निखार, पल्लवी भटारकर, शंकर घुगरे, आकाश महाडूळे यांनी अभिनय केला आहे.

यावेळी सर्व कलाकारांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, सोबतच अविनाश या लघुपटातील संपूर्ण टीम चा सत्कार शाल आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. या प्रसंगी कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी लयतरंग संगीत विद्यालयाचे संचालक अमोल बावणे, चंदन पळवेकर, आणि युवा समरांगण बहुद्देशीय संस्थेचे सचिव राकेश वाघमारे, सिद्धार्थ खोब्रागडे, आणि सागर बरशेट्टीवार, निखिल तेलंग उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.