Breaking News: सेवन स्टार मॉलला आग

● डकटिंग कुलरमध्ये शॉर्टसर्किट होऊन उडाला भडका

0 12

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा रोडवरील सेवन स्टार सुपर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान लागलेल्या या आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठी हानी टळली.

        

प्राप्त माहितीनुसार नेहमीप्रमाणे सेवन स्टार सुपरबाजार मध्ये ग्राहक समान खरेदी करीत होते. दरम्यान मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर स्थित डकटिंग कुलरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले.

मॉलच्या बाजूलाच महावितरणचे कार्यालय असून तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केला. मॉलच्या डाव्या बाजूला स्थित दुकानच्या छतावर चढून काही युवकांनी जळत्या कुलरवर पाणीचा मारा करून आग आटोक्यात आणली.

      

आगीचे रौद्र रुप पाहता परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्याने मोठी हानी टळली.

अल्पवयीन मुलीला करायला गेला प्रपोज, पोलिसांनी ठोकल्या बेडा

 

युवासेनेचा दणका, … अखेर रस्त्याच्या कामाला सुरूवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.