गौराळा फाट्यावर कार व मोटारसायकलचा अपघात

गौराळा येथील दोघे गंभीर, चंद्रपूर येथे उपचार सुरू

12

भास्कर राऊत, मारेगाव: वणी यवतमाळ रोडवरील गौराळा फाट्यावर एका कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम वणी येथे व नंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

गौराळा य़ेथून दोन युवक दुचाकीने (MH 29 BU 0208) वणीहून गौराळा येथे गावी परत जात होते. त्याच वेळी मारेगाव कडून वणीच्या दिशेने एक मारोती स्विफ्ट (MH 34 AM 0362) गाडी जात होती. दरम्यान गौराळा फाट्याजवळ कार व दुचाकीची जबर धडक झाली. या अपघातात मोटारसायकल वरील गौराळा येथील दोन तरुण जखमी झाले.

पवन शंकर टेकाम वय 23 व विक्की शाहू वय 18 असे जखमी झालेल्या युवकांचे नाव आहे. दोनही जखमींना वणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. हा अपघात इतका जबर होता की यात कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.