गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

0 4,093

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गौरकार कॉलनीत राहणाऱ्या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्मत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही.

शहरातील गौरकार कॉलनीत राहणारा स्वप्नील रामदास मेश्राम (28) याचे वरोरा रोडवर कपड्याचे  दुकान आहे. 13 नोव्हेंबर फटरी 10.30 रोजी त्याचे आई वडील हे पुण्याला लग्नासाठी गेले होते. त्यावेळी त्याचे नातेवाईक किशोर मुरलीधर तोडकर यांना फोनवरून माहिती मिळाली की, स्वप्नीलने आत्महत्या केली आहे. त्यांनी त्वरित स्वप्नीलने वडील रामदास याना माहिती दिली व घरी पाहण्याकरिता गेले.

त्यांना समोरच्या हॉल मध्ये स्वप्नीलने गळफास लावल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसात माहिती दिली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्वप्नीलाच मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. शवविच्छेदन केल्यावर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. आत्मत्येचे कारण समजू शकले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.