प्रतिष्ठित व्यापारी रामगोपाल गिरीधारीलाल राठी यांचे निधन

आज स. 10.30 वाजता राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा

11

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील राठी हार्डवेअरचे मालक तथा शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी रामगोपाल गिरीधारीलाल राठी (89) यांचे रविवारी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवारी गांधी चौकातील त्यांच्या राहत्या घरून 10.30 वाजता अंतयात्रा निघणार आहे. मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रामगोपाल यांनी गांधी चौकातच छोटेसे हार्डवेअरच्या दुकानापासून व्यवसायाला सुरुवात केली. जिद्द, परिश्रम याच्या जोरावर त्यांनी एका छोट्याशा दुकानाचे भव्यदिव्य दुकानात रूपांतर केले. यात त्यांना त्यांच्या दोन मुलांचीही मदत झाली. मनमिळावू व मितभाषी अशी ओळख असलेल्या रामगोपाल यांच्या मागे मुलगा अनुप व गिरीश, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.