सोमवारी वणीतून निघणार भव्य तिरंगा मोटर साईकल रॅली

वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

10

जितेंद्र कोठारी, वणी: स्वातंत्र दिनानिमीत्त वणी शहरातून दि. 15 ऑगष्ट रोजी भव्य तिरंगा सन्मान मोटर साईकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समीती वणी तर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9.30 वाजता ही रॅली शासकीय मैदान वणी येथून निघणार आहे. रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ही रॅली शासकीय मैदानातून टिळक चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, मोठी कमान, तुटकी कमान, गाडगेबाबा चौक, नृसिंह आखाडा, जत्रा रोड, दिपक चौपाटी, काठेड चौक, सुभाषचंद्र बोस चौक, सर्योदय चौक, टागौर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, बस स्थानक, साई मंदिर, जगन्नाथ बाबा मठ नांदेपेरा रोड, डि.पी. रोड, विठ्ठलवाडी, एस.बी. लॉन, लोकमान्य टिळक महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक असे मार्गक्रमण करून याची सांगता शासकीय मैदान येथे होणार आहे.

रॅलीनंतर उपस्थितीतांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती वणीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी रवी बेलूरकर, राजाभाऊ पाथ्रडकर, राजू उंबरकर, विजयबाबु चोरडिया, राकेश खुराणा, नितिन शिरभाते, गणपत लेडांगे, रज्जाक पठाण, राजु तुराणकर, अॅड, प्रविण पाठक, अमित उपाध्ये, राजु गव्हाणे, आशिष डंभारे, पंकज कासावार, फाल्गुन गोहोकार व पत्रकार बांधव उपस्थित होते.

हे देखील वाचा:

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत 5 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.