राजूर येथे लोकसहभागातून जि. प. शाळेला विविध वस्तूंची मदत

शाळेला पाण्याच्या कॅन, मॅटिन इत्यादी वस्तूंचे वाटप

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजूर येथेही जि प शाळेला लोकसहभागातून उपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. शासनाने शिक्षणावरील खर्च कमी केल्याने शासकीय प्राथमिक शाळेला प्राथमिक गरजा पूर्ण करणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. हीच परिस्थिती ओळखून राजूर येथील सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार यांनी गावातील लोकांच्या सहभागातून गावात असलेल्या तीन जि प शाळांना शुद्ध व थंड पाणी ठेवण्या करिता कॅन्स व मुलांना विविध कार्यक्रमात वापर करण्यासाठी मॅटिन (प्लस्टिक सतरंजी) आदी वस्तूंची भेट देण्यात आली. तसेच गावातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी जी मदत व गरज भासेल त्यासाठी लोकवर्गणी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही या प्रसंगी देण्यात आली.

या कार्यक्रमाला उपसरपंच अश्विनी बलकी, माजी पं स सदस्य अशोक वानखेडे, डॅनी सॅन्ड्रावार, डेव्हिड पेरकावार, वामन पाटील बलकी, कुमार मोहरमपुरी, ऍड. अरविंद सिडाम, अनिल डवरे, बाळाभाऊ हिकरे, संजय पिसे, नितीन मिलमिले, समय्या कोंकटवार, मंगेश जुनघरी, चंदू मोडक, प्रकाश बलकी,विजय प्रजापती, विजय कंडेवार, सुदर्शन शेंगरपवार,

नाना आत्राम, पायल डवरे, चेतना पाटील, दीपाली सातपुते, वंदना देवतळे, मंजुषा सिडाम, सुचिता पाटील, अस्मिता मोहरमपुरी व राजूर जि प मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश निरे, हिंदी प्रा. शा. चे मुख्याध्यापक रेखा सरकारे, ईजारा येथील मराठी प्रा. शा. चे मुख्याध्यापक भाग्यश्री तेडेवार व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.