कार उलटून एक ठार, तर चार जखमी

चंद्रपूरहून काम घेण्यास कामगार येत होते वणीत

0 1,109

वणी: वणी घुग्गुस रोडवर कारला झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून चार जण जखमी झाले आहे. दुपारी 11.30 च्या दरम्यानची ही घटना आहे. पुनवट जवळ हा अपघात झाला आहे. चंद्रपूरहून वणीकडे येत असताना पुनवट जवळ कार अचानक उलटली आणि कारनं जवळपास तीन ते चार हवेत कोलांट्या घेतल्या. यात मिनारुद्दीन शेख (20) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आलं आहे.

कलकत्ता येथील हे पाच जण असून ते चंद्रपूरला डम्पिंग कुलरचं काम करतात. सोमवारी दुपारी 11.30 च्या सुमारात ते काम घेण्यासाठी चंद्रपूरहून राज्य महामारार्गाने वणीला येत होते. मात्र पुनवटजवळ त्यांच्या कारने  (एम एच 29 एफ 827) अचानक हवेत तीन ते चार कोलांट्या घेतल्या. या अपघातात अपघातात मिनारुद्दीन जागीच ठार झाला. तर त्याचे चार  कामगार सहकारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आलं आहे. या घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

(हे पण वाचा: वणी पोस्ट ऑफिसचे ऑनलाइन व्यवहार ठप्प, ग्राहकांना त्रास)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.