ब्राह्मणी रोडवरील जिनिंगला भीषण आग, हजारो क्विंटल कापूस जळून खाक

19

जितेंद्र कोठारी, वणी: निळापूर-ब्राह्मणी रोडवरील वैभव कोटेक्स या जिनिंगमधल्या शेडमध्ये आज दुपारी 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे 2 ते 2.5 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानक वैभव कोटेक्स येथील एका शेडमधल्या कापसाला आग लागली. ही आग झपाट्याने वाढून आगीने आजूबाजूच्या शेडमधला कापूस कवेत घेतला. दरम्यान जिनिंग मधल्या कर्मचा-यांनी आग विझवण्याची सिस्टिम त्वरित सुरू केल्याने आग पसरली नाही व मोठे नुकसान होण्यापासून वाचले. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मात्र झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.