शेताची रखवाली करणा-या महिलेचा विनयभंग

मजरा शिवारातील घटना, दोन आरोपींना अटक

0 12

विवेक तोटेवार, वणी: शेतात दिवसभर काम करणे व रात्री रखवाली करून शेतातील बंड्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेचा दोघांनी विनयभंग केला. ही घटना 12 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मजरा येथील एका शेतात घडली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

तालुक्यातील मजरा येथे एका शेतात एक कुटुंब राहतात. शेताची राखण करून ते कुटुंब तेथेच बंड्यात राहते. शनिवार 12 जून रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास पीडिता ही बंड्याबाहेर उभी होती. त्यावेळी तिच्यावर पाळत ठेऊन असलेले दोघांनी तिचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडितेने हाताला झटका देऊन आपली सोडवणूक करून मदतीसाठी पतीकडे धाव घेतली.

विनयभंग करणारे दोघांनीही तेथून पळ काढला. घाबरलेल्या पती व पत्नीने वणी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी विनोद संभाजी गेडाम (45) रा. नांदेपेरा व आकाश अशोक किनाके (19) रा. पोहणा यांच्यावर कलम 354 (ड) (अ),34 नुसार गुन्हा नोंद केला व त्यांना अटक केली आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.