गोमांस विक्री प्रकरणातील फरार आरोपीला अटक

एका आरोपीला आधीच अटक, तर दुसरा होता फरार

0 880

विवेक तोटेवार,वणी: रविवारी 10 मे रोजी सकाळी 6 वाजता वणीतील लालपुलिया येथे एका दुचाकी घेऊऩ जाणा-या इसमाची तपासणी केली असता त्याच्या कडे 15 किलो गोमांस आढळून आले होते. या प्रकऱणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यातील एका फरार आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. काल संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली.

रविवार सकाळी 6 वाजता लालपुलिया परिसरात वाहनांची तपासणी सुरू होती. यातच एक इसम शेख शाहिद शेख लतीफ (32) रा. मारेगाव हा त्याच्या दुचाकीवर (MH 29 BA 8732) एका बोरीत भरून वणीत विक्रीसाठी गोमांस आणीत होता. लालपुलीया जवळ पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असात हे मांस अल्ताफ कुरेशी (35) रा. मारेगाव याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. तसेच हे मांस वणीत विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी, गोमांस असा एकूण 43750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर अल्ताफ कुसेशी हा दुसरा आरोपी फरार झाला होता.या दोघांवरही प्राणी संरक्षण कायदा 1976 कलम 5 (ब), (क), 9, 9 (अ) सहकलम 2, 3 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर कारवाई पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी गोपाळ जाधव, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.