वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली

0 10

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत.

बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली आहे. मृतकांची संख्या आता 29 झाली आहे.

निळापूर 1, येनक 1, प्रगतीनगर1, सानेगुरुजी नगर 1, जिजाऊनगर 1, वसंतगंगा विहार 1,गायकवाड फैल 1, नवीन वागदरा 3, छोरिया ले आऊट 1, राजूर कॉलरी वॉर्ड नं 3, वडगाव 1, झरी तालुका 1 असे रुग्ण आढळलेत.

आज 70 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. पॉजिटिव्ह रॅपीड टेस्टमध्ये 14 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. अद्याप यवतमाळहून 1137 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 17 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 304 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 56 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 194 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 54 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 1927 रुग्ण आढळून आलेत. यातील 1594 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत 29 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हेदेखील वाचा

अडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी….

हेदेखील वाचा

गुलजार यांच्या गीतांनी रंगली मैफल सिंफनीची

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.