रंगनाथ स्वामी पतसंस्थेतर्फे महामानवाला अभिवादन

8

जितेंद्र कोठारी, वणी : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठित येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती संस्थेच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार्रापण करण्यात आले.

त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक भोंगळे सर, सुरेशराव बरडे, हरीशंकर पांडे, लिंगारेड्डी अंडेलवार, निमाताई जीवने व उपमुख्य कार्यकारी संजय दोरखंडे तसेच शाखाधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत आंबेडकर चौकात डॉ भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास संस्थेतर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.