नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

15 दिवसानंतर होते मोठ्या बहिणीचे लग्न

0 14

जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या बहिणीच्या लग्नाला 17 दिवस उरले असता डॉक्टर झालेली लहान बहिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी येथील जैन ले आउट मध्ये घडली. काजल सुरेश ढेंगळे (25) असे मृत युवतीचे नाव आहे. मृतकाच्या वडिलांच्या फिर्याद वरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

      

प्राप्त माहितीनुसार येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेश ढेंगळे यांना 2 मुली व 1 मुलगा आहे. मोठी मुलगी  इंजिनिअरिंग करून पुणे येथे नोकरी करीत आहे. तर दुसरी मुलगी कु. काजल हिने नुकतेच एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण करून प्रशिक्षण कालावधी (इंटर्नशिप) पूर्ण केली होती. एमबीबीएस करून पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण साठी तिने फॉर्मही भरले.

काजलच्या मोठी बहीणचे दि. 2 एप्रिल रोजी लग्न निघाले असता रविवारी तिचे आई वडील नातेवाईकांना लग्नाची पत्रिका वाटण्या करीता घराबाहेर पडले होते. दुपारी 1.30 वाजता काजलची वृद्ध आजीने तिला हाक मारली असता तिने काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर तिने दरवाजा ठोठावला असता तो आतून बंद असल्याचे आढळून आले. आजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी येऊन बघितले असता काजल खिडकीला दोर बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले.

याबाबत लगेच कुटुंबियांना कळविण्यात आले. काजलला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. मृतकाची मोठी बहीण व भाऊ पुणे येथे असून काजलचा मृतदेह मोरचरीमध्ये ठेवण्यात आला आहे. मृतक युवतीवर चंद्रपूर येथील मानसिक रोग तज्ज्ञाकडे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मात्र डॉक्टर झालेल्या तरुणीने आत्महत्या सारखे पाउल का उचलले हे कळू शकले नाही.

हे देखील वाचा: 

भाऊ… रेतीच्या गाड्या थांबवा ! साहेब दौऱ्यावर आहे

चेंडकापूर येथे कोरोनाचा शिरकाव, आज 4 पॉजिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.