संत रविदास स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम

सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आले अभिवादन

12

विवेक तोटेवार, वणी: येथील संत रविदास सभागृह येथे समतेचे अग्रदुत संत रविदास महाराज यांना स्मृतिदिनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण करून अभिवादन कारण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग) व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच, वणी तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गटशिक्षण अधिकारी गोसावी खोले होते.

समस्थ जगाला समतावादी, मानवतेचा संदेश देणारे महान संत रविदास महाराज यांच्या स्मृतिदिना निमित्त वणी शहरात सकाळी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले नंतर संत रविदास सभागृहात अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण वणी पंचायत समितीचे माजी गटशिक्षणाधिकारी गोसावी खोले यांनी केले तर संचालन राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभागीय अध्यक्ष रवी धुळे यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष महेश लिपटे, युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे ज्येष्ठ समाज बांधव सुभाषजी कुरील हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच, वणीचे किसन कोरडे, किशोर हांडे, श्याम गिरडकर, पंकज वादेकर, देविदास खोले यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.