जेसीबीने पाडले फर्निचरचे दुकान, लाखोंचे नुकसान

आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल

65

विवेक तोटेवार, वणी: वणीतील माळीपूरा येथील एक फर्निचरचे दुकान बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने पाडले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत वणी पोलिसात आरोपीविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील माळीपूरा येथे पंकज बन्सीलाल भंडारी (47) यांचे नवकार नावाने फर्निचरचे दुकान आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहे. सदर दुकान हे समीर रंगरेज याने विकत घेतले आहे. दुकानाचा ताबा मिळण्याबाबत न्यायालयात केस सुरू आहे. दुकान खाली करण्यावरून फिर्यादी पंकज भंडारी व आरोपी समीर रंगरेज यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहे.

आरोपी समीर रंगरेज याने बुधवारी 11 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पंकज यांच्या दुकान हे जेसीबी मशीनने तोडले. यात दुकानातील 1 लाख 20 हजार नगदी व 50 हजारांचे सामान व दुकानाचे 18 लाख असे एकूण 19 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे त्यांच्या तक्रारीनुसार वणी पोलिसात कलम 457, 380, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

115 रुपयांचा टोल पडला चक्क 27 हजारात !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.