संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विज्ञान मेळावा संपन्न

15
विवेक तोटेवार, वणी: येथील सर्वोदय चौक संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुरुवारी 10 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विज्ञान मेळावा घेण्यात आला. पंचायत समिती वणी तर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती अंतर्गत येणा-या 12 शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद नासरे यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धेतील मार्क्स एकत्र करून प्रथम व द्वितीय क्रमांक देण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी आर्या सचिन मत्ते हिने पटकाविला तर द्वितीय क्रमांक स्व. वि. पा. मांडवकर शाळेची ऐश्वर्या तानाजी गिरसावळे हिने पटकाविला. या दोन्ही विद्यार्थीनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.