नालीच्या पाण्यावरून खाऊन होता खार, शेजा-यावर केले सत्तूरने वार

बोर्डा येथील घटना, सांडपाण्यावरून झाला वाद

0 10

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथील एका इसमावर सत्तूरने वार केल्याने तो गंभीर जखमी आहे. आज बुधवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नालीतील घाण पाणी वाहून जाण्याच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

बंडू माधव तिखट (35) हा बोर्डा येथील रहिवाशी आहे. त्याच्या शेजारीच गंगाराम राऊत हा इसम राहतो. बंडूचे नालीचे सांडपाणी वाहून जाण्यावरून गजाननसोबत नेहमी वाद होत राहायचे. आज बंडूच्या घरातील सांडपाणी वाहून न जाता गजाननच्या घरात आल्याने गजाननने बंडूशी वाद घातला. यावेळी गजानन नशेत असल्याचा आरोप बंडूच्या भावाने केला आहे.

दोघांचा वाद मोठा होऊन गजानने बंडूवर सत्तूरने बंडूवर सपासप वार केले. यामध्ये बंडू याच्या हात, पाय व छातीला जबर जखम झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने बंडूला चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बातमी पब्लिश करेपर्यंत या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.