कारची म्हशींना जोरदार धडक, तीन म्हैस जागीच ठार

एक म्हैस गंभीर जखमी, बंद झालेली कार घटनास्थळावर ठेऊन चालक पसार

0 8

विवेक तोटेवार, वणी: शहरातील बायपास रोडवर असलेल्या संविधान चौकात एका भरधाव कारने म्हशीच्या कळपाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात 3 म्हशी जागीच ठार झाल्या तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. शनिवार 10 जुलै रोजी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

शहरातील वरोरा बायपास चौक हा संविधान चौक म्हणून ओळखला जातो. या चौकात रात्री पावने 9 वाजताच्या सुमारास एक स्विफ्ट कार (MH49 B 3976) वरोरा वरून वणीच्या दिशेने येत होती. भरधाव येणा-या कारसमोर म्हशीचा कळप आला. दरम्यान कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालकाने म्हशीच्या कळपाला जोरदार धडक दिली. यात तीन म्हैशी जागीच ठार झाल्यात, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली.

या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळावरून 100 मीटरवर पुढे धडक देणारी आढळून आली. भीषण अपघातामुळे कार बंद झाल्याने चालकाने कार तिथेच ठेवली व चालक पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बायपासवरून जाणा-या प्रवाशांना अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ सुदर्शन वानोळे यांनी वणी पोलिसांना याबाबत दिली. घटनास्थळी अनंत रपटे यांनी जाऊन बघितले असता तीन म्हशी जागीच मरण पावल्याचे दिसून आले. शिवाय या घटनेत एक म्हैस जखमी झाली होती.

या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादंविच्या कलम 279, 429 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. दोन दिवसांआधी होटेल जन्नत जवळ एका भरधाव लालुगुडा दिशेने वणीकडे येणा-या कारने गायीच्या कळपाला धडक दिली होती. यात 1 गाय जागीच ठार झाली होती. ही घटना ताजी असतानाच दुस-या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली.   

हे देखील वाचा:

रात्री 11 वाजता अविनाश लेनगुरेवर अंत्यसंस्कार

शेतातील बांध फुटून पिंपरी-बाबापूर शेतशिवारात पिकांचे मोठे नुकसान

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.