मानवतेला काळीमा ! शौचास गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

राजूर (कॉलरी) येथील घटना, आरोपीला तात्काळ अटक....

0 14

विवेक तोटेवार, वणी: शौचास गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना आज दिनांक 12 जुलै रोजी राजूर कॉलरी येथे घडली. मो. आरिफ नसिब खान (22) असे या आरोपी विकृताचे नाव असून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणा-या या प्रकरणाने संपूर्ण राजूर गाव हादरून गेले असून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की पीडित चिमुकली ही राजूर कॉलरी येथील रहिवाशी आहे. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास पीडिता घराजवळील रेल्वे रुळाजवळील झुडुपात शौचास गेली होती. दरम्यान आरोपीने चिमुकलीला एकटे पाहून तिच्यावर बळजबरी करीत अत्याचार केला. पीडिता घरी परत आली व तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडितेच्या आईने वडिलांना हा प्रकार सांगून याबाबत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्याचा निश्चय केला. आज दुपारी याबाबत वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली.

तक्रारीवरून आरोपी मोहम्मद आरिफ नसिब खान (22) याच्या विरोधात भादंविच्या कलम 366 (अ), 376 (अ) (ब) सहकलम बाल लैंगिक संरक्षण कायदा (पोस्को) च्या कलम 4, 6 व अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा (ऍट्रोसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपी नराधमाला अटक केली. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार करीत आहे.

हे देखील वाचा:

पिवरडोल येथे तरुणावर हल्ला करणारा नरभक्षक वाघ जेरबंद

आवडीचा ब्रँड आणून न दिल्याचा जाब विचारल्याने बार मालकाची ग्राहकाला मारहाण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.