शुल्लक कारणावरून युवतीला फेकून मारली कुऱ्हाड

मोहुर्ली येथील घटना, बापलेकावर गुन्हा दाखल

10

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मोहूर्ली येथे घराशेजारी असलेले झाड कापण्यावरून युवती व शेजा-यांचे भांडण झाले. या वादात आरोपी युवकाने फिर्यादीला कुऱ्हाड फेकून मारली. ज्यामुळे युवतीच्या पायाला इजा झाली. युवतीने याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी मुलगा व त्याच्या वडिलांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणी (24) ही तालुक्यातील मोहूर्ली येथे राहते. तिच्या घराशेजारी आरोपी राहतो. 7 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास विकास हा तरुणीच्या घरामागे असलेले चिंचेचे झाड तोडत होता. यावर तरुणीने आपल्या घरावर झाडाच्या फांद्या पडेल म्हणून हटकले. यावेळी आरोपीने वाद घालत शिवीगाळ केली. दरम्यान रागाच्या भरात आरोपीने तरुणीला हातातील कुऱ्हाड फेकून मारली.

कु-हाडीमुळे तिच्या पायाला जखम झाली. याचवेळी आरोपीचे वडील देखील या ठिकाणी पोहोचले. त्यांनी देखील तरुणीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा कलम 125 (1), 351 (2), 351 (3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.