मुकुटबन येथे रविवारी रक्तदान शिबिर

युवासेनेतर्फे आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

0 14

सुशील ओझा, झरी: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मुकुटबन येथे रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्यात येणार आहे. रविवारी दिनांक 13 जून रोजी मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणताही बडेजाव न आणता अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे युवासेना झरी तालुक्यातर्फे यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा, तालुका प्रमुख पवन राऊत, तालुका संघटक नीलेश बेलेकर व झरी तालुक्यातील युवासेनेचे पदाधिकारी यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना झरी तालुक्याचे सदस्य व पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

कोरोनासंबंधीची गाईडलाईन पाळून होणार कार्यक्रम: विक्रांत चचडा
आमचे नेते आदित्य ठाकरे यांनी गाजावाजा करून वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आदेशाचा मान ठेऊन व त्यांच्या प्रती असलेल्या प्रेमापोटी जिल्ह्यात ठिकठिकाणी युवासेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम कोरोनासंबंधीची गाईडलाईन पाळून केले जाणार आहे.
: विक्रांत चचडा, जिल्हा प्रमुख युवासेना

हे देखील वाचा:

अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ऍट्रोसिटी दाखल

एका ट्रक चालकाचा दुस-या ट्रक चालकावर लोखंडी रॉडने हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.