दिलासा: आता तालुक्यात अवघे 16 ऍक्टिव्ह रुग्ण

आज तालुक्यात बेलोरा येथील 1 पॉझिटिव्ह

0 11

जब्बार चीनी, वणी: काल शुक्रवारी अचानक शहरात कोरोनाचे 4 रुग्ण आढळल्यानंतर आज शनिवारी आज चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज दिनांक 12 जून रोजी तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळले. याशिवाय आज 8 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता तालुक्यात केवळ 16 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज पॉझिटिव्ह आलेला रुग्ण ग्रामीण भागातील असून बेलोरा येथील आहे.

आज यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नाही. तर आज 38 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आला. आज आलेल्या रुग्णांवरून यवतमाळ येथे 27 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 69 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 16 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 2 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 10 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 4 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 5257 रुग्ण आढळून आलेत. यातील 5148 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

मुकुटबन येथे रविवारी रक्तदान शिबिर

अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ऍट्रोसिटी दाखल

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.