पिसगाव येथील तरुणाची आत्महत्या

पहापळ शेतशिवारात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

0 599

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील रोहित लालाजी दूधकोहळे वय २४ या युवकांनी पिसगांव पहापळ शिवारात गळफास घेवून आत्महत्यां केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. रोहितने पिसगाव पहापळ शिवारात असलेल्या शेतात झाडाला गळफास लावून जिवनयात्रा संपविली. शिवारात असलेल्या शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबांना ही माहिती कळविली. मृतक रोहितच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, विवाहीत दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.