गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला ठोकले सील

50 हजारांचा दंड भरण्यास नकार

0 12

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संसर्ग संबंधी शासनाने लागू केलेले नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला नगर पालिका पथकाने मंगळवार 12 मे रोजी सील ठोकले. तसेच दंड भरण्यास नकार दिल्याने राधिका साडी सेंटरचे संचालका विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

प्राप्त माहितीनुसार प्रशासनाने जिल्ह्यात १५ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करीत अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र शहरातील अनेक कापड व सराफा दुकानदार छुप्या पद्दतीने शटर बंद करुन ग्राहकांना माल विक्री करीत आहे. दुकानात ग्राहकांना बसवून तसेच बाहेरून शटर बंद करुन व्यवसाय करीत असल्याचा माहितीवरून पालिका प्रशासनाने सोमवारी येथील प्रख्यात माहेर कापड केंद्रावर धाड टाकून 50 हजार रुपये दंड वसूल करुन दुकानाला सील लावले होते.

त्यानंतर आज मंगळवारी गांधी चौक येथील राधिका साडी सेंटरवर पथकाने कार्यवाही केली. कार्यवाही दरम्यान दंड भरण्यावरून दुकानदार व अधिकाऱ्यांमध्ये वाद उद्भवला. दंड भरण्यास नकार दिल्यामुळे अखेर पथक प्रमुख खुशाल भोंगळे यांच्या फिर्यादवरुन राधिका साडी सेंटरचे संचालक प्रदीप खत्री विरुद्द वणी पो.स्टे. मध्ये आपत्ती व्यवस्थापन कलम 188 व 269 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई प्रभारी तहसीलदार विवेक पांडे, प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडे, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, नायब तहसीलदार महेंद्र कापशीकर, न.प. कर निरीक्षक खुशाल भोंगळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

हे देखील वाचा:

100 रुपयांत दुरुस्त होऊ शकतो कोरोनाचा रुग्ण !

आज तालुक्यात 64 पॉझिटिव्ह तर 97 रुग्णांची कोरोनावर मात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.