लालपुलियाजवळ भीषण अपघात, दोन तरुण जागीच ठार

58

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील लालपुलिया जवळ एका ट्रकची दुचाकीस्वाला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दोघेही ट्रकच्या मागील चाकात येऊन चिरडले गेले. या अपघातात दुचाकीस्वार व मागे बसलेला प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात मृतदेहाचा चेंदामे़ंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नातेवाईकांनी ट्रकच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते.

प्राप्त माहितीनुसार, महादेव कांबळे हे मेघदूत कॉलोनी चिखलगाव येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरी गुरुवारी लग्नकार्य होते. त्यानिमित्त त्यांच्या घरी पाहुणे आले होते. आज शुक्रवारी दिनांक 12 मे रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या घरातील दोन पाहुणे हे पॅशन या दुचाकीने (Mh 29 AH 8391) प्लेट, कप व इतर साहित्य आणण्यासाठी वणीला आले होते. सामान परत घेऊन ते मेघदूत कॉलनीत परत जात होते. 9 वाजताच्या सुमारास देशप्रेमी हॉटेल जवळ एक ट्रक (MH34 BG 1983) जात होता. या ट्रकला ओव्हटेक करताना भरधाव ट्रकचा धक्का दुचाकीला लागला.

दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दोघेही ट्रकच्या मागच्या चाकात आले. दोघांच्याही छाती पासून वरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळावर काही वेळ दोन्ही मृतदेह पडलेले होते.

बराच वेळ झाल्याने दोन्ही पाहुणे घरी न आल्याने एकाने त्यांना फोन केला असता दोघांचाही अपघात झाल्याची माहिती कांबळे कुटुंबियांना मिळाली. कांबळे कुटुंबीय तात्काळ घटनास्थी पोहोचले. घटनास्थळी संतप्त नातेवाईकांनी ट्रकच्या काचांची तोडफोड केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ चक्का जाम केला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.