विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने निर्गुडा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विनोद भादीकर (37) असे मृतकाचे नाव असून तो उत्कृष्ट खेळाडू होता. कुटुंबााचा गाडा हाकण्यासाठी तो मिळेल ते मजुरीचे काम करायचा. तो एका रेस्टॉरन्टमध्ये वेटरचे काम करायचा. मंगळवारी दिनांक 11 एप्रिल रोजी संध्या. 5 वाजताच्या सुमारास तो मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या ब्रिजवर गेला होता. तिथून त्याने निर्गुडा नदीत उडी घेतली. हे रस्त्यावरच्या लोकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटना घडल्यावर लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. मात्र विनोद नदीत दिसून येत नसल्याने पोलिसांनी याची माहिती पालिकेला दिली. पालिकेने गोताखोरांची मदत घेतली. काही काळानंतर विनोदचा मृतदेह गोताखोरांच्या हाती लागला. विनोद एक चांगला खेळाडू होता. मात्र काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहिती त्याच्या परिचितांनी दिली. विनोदने आत्महत्येचे पाऊल का उचलले याची माहिती मिळू शकली नाही.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.