मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली… अन् घरी परतलीच नाही

अल्पवयीन मुलगी बेपत्ता, तक्रार दाखल

11

विवेक तोटेवार, वणी: ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारी एक कुमारीका ही मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते अशी सांगून गेली मात्र घरीच परतली नाही. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली आहे.

कुमारिका ही शहरातील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती दररोज कॉलेज करून आपले शिकवणी वर्ग पूर्ण करीत होती. दिवसभर कॉलेज व शिकवणी वर्ग झाल्यावर सायंकाळी 5.30 वाजता ती आपल्या दुचाकीने घरी परत यायची.

शुक्रवारी दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता तिने शिकवणी वर्ग झाल्यावर तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री 7.30 वाजेपर्यंत घरी येणार असल्याची तिने कळवले. मात्र रात्री उशिर झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. पालकांनी फोन करून बघितला असता तिचा फोन स्विच्ड ऑफ येत होता.

घाबरलेल्या पालकांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून विचारणा केली असता ती शिकवणी वर्गाला आलीच नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पालकांनी नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी 12 मार्च रोजी पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम 363 नुसार तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

वणीतील व्यक्तीचा नागपूर येथे संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

आता तुमच्या लहान बाळाची सर्व शॉपिंग एकाच छताखाली

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.