घरातून अडीच लाखांची सोन्याची पोत केली लंपास

वणी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

8

 

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 9 मार्च रोजी काळे ले आऊट येथील एका बंद घरातून चोरट्याने कुलूप उघडून 35 ग्रॅम सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रुपेश नंदकिशोर भटगरे (30) रा. काळे ले आऊट येथील रहिवासी आहे. ते शनिवार 9 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता आपल्या घराला कुलूप लावून चावी खिडकीत ठेऊन कामानिमित्त बाहेर गेले. ते रविवारी घरी आले. तेव्हा त्यांना घराचे दार उघडे दिसले. घरात पाहणी केली असता कपातही उघडे होते.

कपाटातून 35 ग्रॅम सोन्याची किंमत 2 लाख 39 हजार 670 रुपयांची पोत दुसून आली नाही. रुपेश यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी कलम 354, 380 नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.