चिखलगाव येथील अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

11

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे राहणा-या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आचल ठावरी (वय 17) असे मृतकाचे नाव असून ती शहरातील एका कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात शिकत होती. सविस्तर वृत्त असे की आचलला वडील नसल्याने ती आई व भावासह तिच्या आजोबाकडे चिखलगाव येथे राहत होती. आज शनिवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास तिने घरी कुणी नसताना गळफास घेतला. तिच्या कुटुंबीयांना ही बाब माहिती झाल्यावर त्यांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.