कोसा-याजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, युवक ठार

रात्रभर दुचाकीस्वार पडून होता रस्त्याच्या कडेला...

21

भास्कर राऊत, मारेगाव: एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या एका युवकाच्या दुचाकीचा परतताना भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुहास उर्फ गोलू गजानन आडे (18) असे मृत युवकाचे नाव असून तो तालुक्यातील बुरांडा येथील रहिवासी होता. ही घटना आज गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विशेष म्हणजे धडक देऊन वाहन चालक पसार झाला तर अंधारामुळे मृतक रात्र

सुहास हा बुधवारी दि. 11 जानेवारीला बोरी (माढेळी) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथे त्याच्या आजोबाकडे पॅशन प्रो (MH29 AA5028) या दुचाकीने काही कार्यक्रमानिमित्त गेला होता. कार्यक्रम आटपून तो रात्रीच्या सुमारास परतत होता. दरम्यान कोसारा फाट्याजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने सुहासच्या दुचाकीला जबर धडक दिली.

धडक दिल्याने तो दुचाकीसह रोडच्या कडेला असलेल्या नालीत कोसळला. रात्रीची वेळ असल्याने ही घटना ये-जा करणाऱ्याच्या निदर्शनास आली नाही. पण आज गुरुवारी दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कार्यक्रमातून परत येताना काळाचा घाला

या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेत सुहासचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असुन मृतकाच्या पश्चात आई, वडील असा आप्तपरीवार आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात शुंकुरवार जामदार करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.