राजमाता जिजाऊ जयंती निमित्त वणीत अभिवादन कार्यक्रम

विविध संस्थेमार्फत जिजाऊ चौकात स्वच्छता अभियान

27

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नगर सेवा स्वच्छता समिती वणी, ICAN करियर अकॅडमी वणी उड्डाण करियर अकॅडमी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलगाव मुकुटबन रोड येथे जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे वणी तालुका अध्यक्ष अंबादास वाघदरकर तसेच ज्योती साखरकर यांनी माता जिजाऊ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. मान्यवरांनी जिजाऊंच्या कार्याची माहिती दिली.

या वेळी मराठा सेवा संघाचे ऋषिकांत पेचे, भाऊसाहेब आसुटकर, मारोती जिवतोडे, अजय धोबे, दत्ता डोहे, अमोल टोंगे, मंगेश खामनकर नगर सेवा स्वच्छता समिती चे अध्यक्ष नामदेव शेलवडे, दिनकर ढवस, राजेंद्र साखरकर, शेलवडे, ICAN करियर अकॅडमीचे सोपान लाड, उड्डाण करीयर अकॅडमीचे गणेश आसुटकर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन खुशी खिरेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन महेश लिपटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर सेवा स्वच्छता समिती वणी, ICAN करियर अकॅडमी वणी उड्डाण करियर अकॅडमी वणीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना प्रतिष्ठेचा MDRT बहुमान

वणीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती उत्साहात साजरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.