मछिंद्रा-मार्डी रोडवर दुचाकीचा अपघात, एक गंभीर

जखमीला उपचासाठी चंद्रपूर येथे रेफर

17

जितेंद्र कोठारी, वणी: मार्डी-मछिंद्रा रोडवर आज रात्री 9 वाजताच्या सुमारास अपघात झाला. एका दुचाकीने दुस-या दुचाकीला जबर धडक दिली. यात एका मागे बसलेल्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मारोती घाटे असे जखमीचे नाव आहे. मारोतीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मारोती घाटे हा मछिंद्रा (डोल) येथील रहिवाशी आहे. तो त्यांच्या एका मित्रसह मछिंद्र्यावरून मार्डी येथे दुचाकीने गेला होता. रात्री मार्डीहून मछिंद्र्याला परतत असताना 9 वाजताच्या सुमारास मार्डी-मछिंद्रा रोडवरील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला मार्डी कडे जाणा-या एका दुचाकीने धडक दिली. अपघातात चालक जखमी झाला. तर मागे बसलेल्या मारोतीच्या पायाला जबर ईजा झाली.

मारोतीच्या चालक मित्राने अपघाताची माहिती गावातील लोकांना कॉल करून दिली. गावातील लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ऍम्बुलन्स बोलावली व मारोतीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. मात्र प्रकृती गंभीर असल्याने मारोतीला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. यावेळी स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी रुग्णाला चंद्रपूर येथे हलवण्यासाठी मदत केली.

हे देखील वाचा:

दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

म्हैसदोडका येथे युवकाची आत्महत्या

मारेगाव (कोरंबी) येथील विवाहित तरुण 3 दिवसांपासून बेपत्ता

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.