विचित्र अपघातात १ ठार, ३ गंभीर

अपघात पाहताना झाले पुन्हा दोन अपघात

0 839

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील विश्रामगृहाजवळ सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात अाले.

प्राप्त माहिती नुसार शहरातील विश्रामगृहा समोर महामार्गावर अनोळखी वाहनाने एका इसमास धडक दिल्याने तो जागीच ठार झाला होता. दरम्यान अपघात पाहण्यासाठी लोकाची गर्दी झाली होती. या दरम्यान यवतमाळकडून येनाऱ्या mg 28, b.8650 या वाहनाने गर्दी दिसताच ब्रक मारला. परंतु त्यामागुन येनाऱ्या आयशर वाहन क्र.MH 04,DS 9415 ने समोर उभ्या असलेल्या जबर धडक दिली.

याच दरम्यान. मागून येणाऱ्या दुचाकी वाहन क्र.MH29,X7463 ने ट्रकला मागून धडक दिल्याने दुचाकीवरिल सुभाष आत्राम (४०) भालेवाडी, अनिल आत्राम (३०), घुसरु टेकाम (४०) हे जखमी झाले असुन सर्व जखमींना मारेगाव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतकाचे नाव बबनराव असल्याचे समजते. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टशनचे उपनिरिक्षक शशिकांत नागारगोजे करीत आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.