आज कोरोनाचा विस्फोट, 23 पॉजिटिव्ह

पुनवट येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

0 10

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी 10 नोव्हेंबरला अचानक 23 कोरोना पॉजिटिव्ह आढळलेत. तर पुनवट येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. आतापर्यंत तालुक्यातले कोरोनाचे प्रमाण कमी होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर चिंता वाढली. दिवाळी येत आहे. त्यासाठी परिसरातील अनेक गावांतून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगून सावध राहावे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आज आलेल्या रुग्णांत पुनवट 9, वणी शहर 8, गणेशपूर 1,सुकनेगाव1, भांदेवाडा 1,पळसोनी 2, कानडा 1 यांचा समावेश आहे. आज यवतमाळ हून 80 अहवाल प्राप्त झाले यातील 23 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. 21 रॅपिड अँटीजण टेस्ट तर 4 पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट करण्यात आल्यात. तर 61 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 4 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 44 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 66 ऍक्टिव्ह रुग्ण

सध्या तालुक्यात एकूण 844 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 775 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 5 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या तालुक्या 66 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 33 जण होम आयसोलेट आहेत. 33 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 21 झाली आहे.

दिवाळीच्या तोंडावर सावधगिरी आवश्यक
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.. एकीकडे दिवाळी जवळ येत असताना अचानक शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. शहरात ग्रामीण भागातून दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. जर शहरातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ही धोक्याची घंटा ठरू शकते.

हेदेखील वाचा

 

आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.