रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीची कार्यकारिणी घोषित

ऑनलाईनच झाला 2020-2021चा पदग्रहण समारंभ

0 11

जब्बार चिनी, वणी: रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीची सन 2020-2021ची कार्यकारिणी घोषित झाली. या कार्यकारणिचा पदग्रहण समारंभ पहिल्यांदाच झूम प्लॅटफॉर्म वर घेण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून रोटे. निखिल केडिया आणि सचिव म्हणून रोटे आशीष गुप्ता यांना मागील वर्षाचे अध्यक्ष रोटे. अनिल उत्तरवार आणि सचिव रोटे. निकेत गुप्ता यांनी पदभार सोपविला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी तुळशीरामजी केडिया, रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे गवर्नर रोटे. शब्बीर शाकीर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे ए. जी. रोटे. सचिन गँगरेद्दीवार आणि की नोट स्पीकर म्हणून रोटे. डॉ. आनंद झुनझुनवाला खामगाव (रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे सन 2022-2023 चे नियुक्त गवर्नर) हे झूम प्लॅटफॉर्म वर उपस्थित होते.

झूम प्लॅटफॉर्म वर रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे पाच माजी गवर्नर तथा इतर डिस्ट्रिक्ट ऑफीसर आणि वरिष्ठ सदस्य आणि रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीची सर्व नवीन कार्यकारिणी आणि सर्व सदस्य हेसुध्दा उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष रोटे. निखिल केडिया यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. सदर समारंभात सर्व प्रमुख पाहुणे यांनी रोटरीचे कार्य आणि कोविडसारख्या वैश्विक संकटात रोटरीची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. तसेच नवीन कार्यकारणीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पाचही माजी गवर्नर यांनीसुध्दा नवीन कार्यकारणीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन झूम प्लॅटफॉर्म वरून माजी अध्यक्ष रोटे. ऍड. नीलेश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता रोटरी डिस्ट्रिक्ट 3030च्या सचिव रोटे. टोबी मॅडम यांनी नागपूरवरून आणि रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.