छ. शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित करा

शिवसैनिकांचे एसडीओंना निवेदन

0 9

विवेक तोटेवार, वणी: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेध करत तो पुतळा पुन्हा त्याच जागी बसवावा अशी मागणी शिवसैनिकांतर्फे करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकर यांच्यासह शिवसैनिकांनी आज दुपारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

कर्नाटक सरकारने मनगुत्ती या गावात असलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटवला होता. ही बातमी समोर येताच राज्यभरात याचे पडसाद उमटले. वणीतही रविवारी संतप्त शिवसैनिकांनी एकत्र येत टिळक चौकात कर्नाटक सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला होता. आज या प्रकरणी निवेदन देत पुतळा त्याच जागी बसवण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन देते वेळी दीपक कोकास, राजू तुराणकर, सुनील कातकडे, मुन्ना बोथरा, ललित लांजेवार, कीर्ती देशकर, अजिंक्य शेन्डे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.