आठवडी बाजारात थरार.. तरुणावर कु-हाडीने हल्ला

77

भास्कर राऊत, मारेगाव: बाजारचा दिवस,सायंकाळी साडे आठची वेळ… बाजार संपायला आलेला.. बाहेरगाववरून आलेली मंडळी आपापल्या गावी परतायच्या मार्गांवर… अशातच दोघांमध्ये वाद होतो… वादाचे रूपांतर शेवटी जीवघेण्या हल्यात झाले… यात तरुणाची मृत्यू झाला… ही घटना बुधवार दि.9 ऑगस्टला सायंकाळी 8 च्या सुमारास घडली. मृत्यूशी झुंज अपयशी ठरलेल्याचे नाव कैलास बंडू सलाम वय अंदाजे 20 ते 22 असून संशयित आरोपीचे नाव प्रदीप गोविंदा भारशंकर वय अंदाजे 30 असे आहे.

दर बुधवारला मार्डी येथे आठवडी बाजार भरत असतो. यासाठी कैलास हा आला होता. मार्डी येथील मुख्य चौकात कैलास आणि प्रदीप यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये संशयित प्रदीपने कैलासच्या गळ्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कैलास निपचित पडलेला होता.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. उपस्थित नागरिकाने याची माहिती जनहित कल्याण संघटनेला दिली. जखमी तरुणाला रुग्णवाहिकेने प्रथम मारेगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने कैलासला वणी येथील एका खासगी रुग्णैलयात नेण्यात आले. मात्र दरम्यान त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.