‘तो’ सतत घालायचा लग्नाची मागणी, हातात घातली पोलिसांनी बेडी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी गजाआड...

0 2,888

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी 10 जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वणीतील जटाशंकर चौकात एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. आरोपी हा पीडितेला कायम लग्नाची मागणी घालून त्रास देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता ही सावर्ला येथील रहिवाशी आहे. ती वणीतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तर आरोपी गणेश कवडू उपरे (22) हा कोना येथील रहिवाशी आहे. पीडितेची आत्या ही आरोपीच्या कोना या गावातील असल्याने ती आरोपीला ओळखत होती. गणेश तिला सतत फोन करून लग्नाची मागणी घालीत होता. पीडिता त्याला नेहमीच नकार देत होती. ही बाब गणेशच्या चांगलीच जिव्हारी लागायची.

सततच्या त्रासामुळे पीडिता कंटाळली होती मात्र तिथे त्याकडे दुर्लक्ष केले. आज बुधवारी दिनांक 10 जून रोजी पीडिता तिच्या मामी व मामीच्या मुलीसोबत कपडे घेण्याकरिता वणीला जाणार होती. याची माहिती मिळताच गणेशने त्यांचा पाठलाग करायचा ठरवीले. पीडिता तिच्या मामी व मेव्हणीसोबत जटाशंकर चौकातील सेंट्रल बँकेच्या खाली उभ्या होत्या.

त्याचवेळी आरोपीने आपली दुचाकी त्यांच्याजवळ आणून उभी केली व तू लग्नास नकार देत आहे असे म्हणून पीडितेच्या गालावर झापड मारली. भर चौकात झापड मारल्याने पीडिता गोंधळून गेली. तिने घरी येऊन आपल्या आई व वडिलांना ही बाब सांगितली. त्यांनी त्वरित वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून आरोपी गणेशला गजाआड करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध कलम 354 (1), (2), 323 व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.