11 वीत शिकणा-या मुलीला अज्ञात इसमाने नेले पळवून

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

8

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका गावात 8 एप्रिल रोजी रात्री एक कॉलेज कुमारी घरातून निघून गेली. कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची शंका असल्याने मुलीच्या आईने शिरपूर ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 पीडिता ही तालुक्यातील एका गावात राहते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरी ती तिची लहान बहिण व आईसह राहते. पीडिता ही तालुक्यातील एका कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात शिकते.  बुधवारी 8 एप्रिल रोजी रात्री घरी नेहमीप्रमाणे सर्व झोपले होते. पहाटे 4 वाजताच्या सुमारास आईने उठून बघितले असता घरात त्यांची मुलगी आढळून आली नाही. मुलीच्या आईे दुस-या दिवशी शोधाशोध केला तसेच नातेवाईकांकडे विचारणा केली. मात्र मुलगी आढळून आली नाही.

अखेर मुलीच्या आईला मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे तिने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपस शिरपूर पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.