डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

0 620

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थात ज्ञानदिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि. 8एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाअंतरगत स्थानिक क्रांतीविर बिरसामुंडा नगर परिषद शाळा क्र 9 येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत वर्ग 1 ते 4 च्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक वसंत आडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील उपक्रमशिल शिक्षिका वेणुताई गाऊत्रे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.